अमली पदार्थ धाड प्रकरण -आरोपीची झडती घेणारा अधिकारी पथकातील नसावा, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
high court mumbai

अमली पदार्थ बाळगल्याचा संशय असलेल्या आरोपीची झडती धाड टाकणाऱया पथकातील अधिकाऱयाने घेऊ नये, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.

संशयित आरोपीची झडती घेण्याचे अधिकार गॅझेटेड अधिकाऱ्याला आहेत. मात्र हा अधिकारी धाड टाकणाऱ्या पथकातील नसावा, अशी तरतूद एनडीपीएस कायद्यात करण्यात आली आहे. या तरतुदीचे पालन न झाल्यास संबधित कायद्याच्या मूळ हेतूलाच बगल देण्यासारखे ठरेल, असे न्या. श्रीराम शिरसाट यांच्या एकल पीठाने नमूद केले.

एका केनियन नागरिकाला विशेष न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा ठोठावली. त्याच्यावर अंमली पदार्थ बाळगल्याचा आरोप होता. या शिक्षेला त्याने याचिकेद्वारे आव्हान दिले. मला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. सापळा रचणाऱया

गैरवापर टाळण्यासाठी नियम 

सामान्य नागरिक खोटय़ा आरोपात गोवला जाऊ नये यासाठी एनडीपीएस कायद्यात विशेष तरतूद करण्यात आली आहे. आरोपीची झडती घेणारा अधिकारी धाड टाकणाऱया पथकातील नसावा, असे या तरतुदीत स्पष्टपणे नमूद आहे, जेणेकरून आरोपी पथकातील अधिकाऱ्यांची झडती घेण्यास त्या गॅझेटेड ऑफिसरला सांगू शकतो, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.