बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणी 27 आरोपींविरुद्ध आरोप निश्चित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील 27 आरोपींना विशेष मकोका न्यायालयात हजर करण्यात आले तर काही आरोपी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुनावणीला उपस्थित होते. या सर्व आरोपींविरोधात विशेष न्यायालयाने मकोका व भारतीय न्यायसंहिताअंतर्गत आरोप निश्चित केले असून 24 फेब्रुवारीपासून त्यांच्याविरोधात खटला सुरू होणार आहे.

माजी आमदार बाबा सिद्दिकी यांची 12 ऑक्टोबर 2024 च्या रात्री वांद्रे येथे तीन हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. पोलिसांनी आतापर्यंत 27 हून अधिक आरोपींना ताब्यात घेतले आहे. विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्यासमोर आज मंगळवारी सर्व आरोपींना प्रत्यक्ष तसेच व्हीसीच्या माध्यमातून हजर करण्यात आले त्यावेळी न्यायालयाने सर्व आरोपींचे जबाब नोंदवले.