संगमेश्वर तालुक्यात “नोटा” मतदानात लक्षणीय वाढ, धामापूर, कडवई, कसबा, साडवली, दाभोळे आदी भागांत ‘वरीलपैकी एकही नाही’ला पसंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत ‘वरीलपैकी एकही नाही’ (नोटा) या पर्यायाला मिळालेल्या मतांनी लक्ष वेधून घेतले आहे. तालुक्यातील विविध मतदान केंद्रांवर नोटा मतदानाची संख्या लक्षणीय असून, ही बाब राजकीयदृष्ट्या विचार करण्यासारखी ठरत आहे.

धामापूर परिसरातून १२१, कडवईत १४२, कसबा भागातून २६६, मुचरीत १८१, कोसुंबमध्ये १२९, साडवलीत ३०७, तर दाभोळे येथे तब्बल ३५७ मतदारांनी नोटा पर्यायाची निवड केली आहे.नोटा मतदानातील ही वाढ केवळ आकडेवारीपुरती मर्यादित नसून, ती मतदारांमधील असंतोष, उमेदवारांबाबतची नाराजी किंवा राजकीय पक्षांविषयीची उदासीनता दर्शवत असल्याची चर्चा आहे. विशेषतः ग्रामीण भागात इतक्या मोठ्या प्रमाणात नोटा मतदान होणे, हे सर्वच पक्षांसाठी आत्मपरीक्षणाचे संकेत मानले जात आहेत.