Lamborghini Crash: बड्या तंबाखू व्यापाऱ्याच्या मुलाला रुग्णालयातून अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
tobacco-tycoon-son-shivam-mishra-arrested-kanpur-lamborghini-crash

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये १० कोटी रुपयांहून अधिक किंमत असलेल्या लॅम्बोर्गिनी कारने पादचाऱ्यांना चिरडल्याच्या प्रकरणाला आता मोठे वळण मिळाले आहे. या अपघातानंतर फरार असलेला मुख्य आरोपी शिवम मिश्रा याला पोलिसांनी गुरुवारी सकाळी अटक केली. शिवम हा उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध तंबाखू व्यापारी के.के. मिश्रा यांचा मुलगा आहे.

गेल्या रविवारी दुपारी कानपूरमधील गजबजलेल्या ‘व्हीआयपी रोड’वर (VIP Road) हा अपघात झाला होता. शिवम चालवत असलेल्या १० कोटींच्या ‘लॅम्बोर्गिनी रेव्युल्टो’ (Lamborghini Revuelto) या हायस्पीड स्पोर्ट्स कारने नियंत्रणाबाहेर जात रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांना आणि इतर वाहनांना धडक दिली होती. या अपघातात काही जण जखमी झाले होते.

रुग्णालयातून बेड्या अपघातानंतर चार दिवस शिवम पोलिसांना चकवा देत होता. अखेर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला असता तो एका रुग्णालयात उपचार घेत असल्याचे समजले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला रुग्णालयातूनच ताब्यात घेतले. या हायप्रोफाईल प्रकरणामुळे कानपूरमध्ये सध्या मोठी चर्चा सुरू आहे.