
डाळ शिजवताना कुकरमधून पाणी बाहेर येते. असे होऊ नये म्हणून डाळीत पाण्याचे योग्य प्रमाण टाकावे. डाळ शिजवताना कुकरचे झाकण व्यवस्थित बंद आहे का, रबर गॅस्केटची स्थिती चांगली आहे का याची खात्री करा.
जुन्या पद्धतीप्रमाणे डाळ शिजवताना कुकरमध्ये डाळीच्या भांडय़ात एक छोटी वाटी ठेवली की डाळ खूप छान मऊ शिजते. प्रेशर कुकरच्या शिट्टीच्या भागावर थोडे तूप लावावे लागेल. तूप लावल्याने कुकरमधून पाणी बाहेर पडणार नाही.



























































