शारदाश्रम विद्यामंदिरने पटकावला आपटे करडंक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मनोरमाबाई आपटे स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या 16 वर्षांखालील मुलींच्या अंतिम सामन्यात शारदाश्रम विद्यामंदिर इंग्लिश शाळेने पराग इंग्लिश शाळेवर मात करत जेतेपद पटकावले. प्रथम फलंदाजी करताना पराग इंग्लिशने 22 षटकांत 3 बाद 173 धावा केल्या. प्रत्युत्तरात शारदाश्रमने 21.4 षटकांत 2 बाद 174 धावा करून लक्ष्य गाठले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ माजी क्रिकेटपटू वामन आपटे, प्रदीप सुंदरम आणि नदीम मेमन यांच्या हस्ते झाले.