
‘नाचू किती नाचू किती कंबर लचकली’ या जुन्या गाजलेल्या गीताची आजही नव्या पिढीत व्रेझ आहे. पाच तरुणींचा याच गाण्यावरचा जबरदस्त असा डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकाच्या तोंडून एकच वाक्य निघतंय – क्या बात है. तरुणींचा डान्स एकदा पाहून नेटकऱ्यांचे मन भरत नाही. आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. ‘काय ती अदा, काय तो डान्स’ अशा प्रतिक्रिया व्हिडीओवर येत आहेत. हा व्हिडीओ mital__13 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.


























































