जनतेचा विश्वास सार्थ करा, जनसेवेची मशाल धगधगती ठेवा – उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उरण नगरपालिका आणि रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील शिवसेना महाविकास आघाडीच्या विजयी शिलेदारांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. जनतेने जो उदंड विश्वास दाखवला आहे तो सार्थ करा, जनसेवेची मशाल अखंड धगधगत ठेवा अशा शुभेच्छा उद्धव ठाकरे यांनी त्यांना यावेळी दिल्या.

नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत उरणमध्ये शिवसेना राष्ट्रवादी महाविकास आघाडीने दणदणीत यश मिळवले. नगराध्यक्षा भावना घाणेकर (राष्ट्रवादी शरद पवार पक्ष) यांच्यासह शिवसेना नगरसेवक राजेंद्र म्हात्रे, वंदना पवार, अमित म्हात्रे, अतुल ठाकूर, प्रमिला पवार, मंगेश कासारे, तनिषा पाटील तसेच नाहिदा ठाकूर (काँग्रेस), प्रार्थना म्हात्रे (राष्ट्रवादी शरद पवार पक्ष) हे नऊ नगरसेवक विजयी झाले. त्यांच्यासह नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेले शिवसेनेचे कमल भस्मा, दीपक भोईर,कविता पाटील, मारुती घारे, परेश ठाकूर, वैदेही घरत, प्रमिला पाटील, प्रेरणा पाटील, वैशाली खैर या सर्वांनी आज मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, माजी आमदार-जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांच्यासह उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, खालापूर तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, पनवेल तालुकाप्रमुख महेंद्र गायकर,चौक विभागप्रमुख प्रफुल्ल विचारे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.