अचानक दाढ दुखू लागल्यावर काय उपाय करायला हवेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दातांची आणि दाढांची नीट निगा न राखल्यास दाढा आणि दात किडतात. त्यामुळेच दातदुखी किंवा दाढदुखी ही अनेकदा डोकेदुखी ठरते. रात्री अपरात्री दात दुखल्यानंतर काय करावे हे सूचत नाही. त्यामुळेच या दुखण्यावर मात करण्यासाठी आपल्या घरीच असलेल्या काही गोष्टींमुळे आपल्याला आरामात मात करता येईल. दातदुखी व्हायला लागल्यावर डाॅक्टरांकडे जाण्याशिवाय आपल्याला पर्याय उरत नाही. अनेकदा दातदुखी ही डोकेदुखी ठरते, शिवाय दातदुखीवर आयत्यावेळी इलाज काय करायचा असाही प्रश्न पडतो. बरेचदा तर दातदुखीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, हे दुखणं कालांतराने अधिक वाढण्याची शक्यता अधिक असते.

पांढरा की लाल? कोणता कांदा आपण खायला हवा

दातदुखी वाढल्यास या दुखण्यातून मार्ग काढण्यासाठी फक्त डाॅक्टर हाच एक पर्याय असतो. परंतु दातदुखी कमी प्रमाणात असतानाच आपण काही घरगुती उपाय करुनही दातदुखीवर उपचार करु शकतो. दातदुखीवर उपचार करण्यासाठी घरगुती उपायांनीही बरे वाटण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. बरेचदा रात्री अपरात्री आपल्याला दातदुखीला सामोरे जावे लागते. दातांचे दुखणे म्हणजे एक भयंकर दुखणे म्हटले जाते. परंतु घरच्या घरी काही उपाय करून आपण दातदुखीवर आराम मात्र नक्कीच मिळवू शकतो.

घरगुती उपचार

दातदुखीवर बटाटा खूप गुणकारी मानला जातो. दुखणाऱ्या जागेवर बटाट्याचा तुकडा लावल्याने दातदुखीपासून आराम मिळतो.

मोहरीचे तेल जवळपास प्रत्येक घरात स्वयंपाकासाठी वापरले जाते. दातदुखीमध्ये आराम मिळवण्यासाठी याचा वापर बऱ्याच काळापासून केला जात आहे. यासाठी तेलात चिमूटभर मीठ मिसळून हिरड्यांना मसाज केल्याने दातदुखीपासून आराम मिळतो.

झेंडूचे फूल आहे सौंदर्यासाठी वरदान, आता घरीच मिळेल पार्लरसारखी चमक

लिंबाचा वापर चव आणि आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्याने दातदुखीपासून आराम मिळतो. यासाठी दातदुखीच्या ठिकाणी लिंबाचा तुकडा लावावा, त्यामुळे वेदना कमी होऊ शकतात.