ईपीएफओ लाँच करणार नवीन मोबाईल अॅप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या सदस्यांसाठी मार्च किंवा एप्रिलमध्ये नवीन मोबाईल अॅप लाँच करणार आहे. सध्या या अॅपची चाचणी सुरू आहे. तांत्रिक त्रुटी दूर केल्यानंतर हे अॅप लाँच केले जाईल. हे अॅप उमंग अॅपपेक्षा वेगळे असेल. हे अॅप सदस्याच्या बँक खात्याशी लिंक केलेले असेल. तसेच भीम अॅप आणि यूपीआय अॅप्सशी देखील लिंक असेल. यामुळे सदस्यांना पीएफचे पैसे थेट यूपीआयद्वारे थेट बँक खात्यात हस्तांतरित करण्याची सुविधा मिळणार आहे. यासाठी सदस्यांना अॅपमध्ये लॉगिन करावे लागेल. यूपीआय पिन टाकल्यानंतर व्यवहार पूर्ण करता येईल. पासबुक शिल्लक तपासणी सारख्या इतर सेवादेखील अॅपमध्ये उपलब्ध असतील.

ईपीएफओ सध्या 100 डमी खात्यांवर चाचणी करत आहे. ही चाचणी पूर्ण झाल्यानंतर नवीन अॅप सदस्यांसाठी आणले जाईल. या सुविधेमुळे पीएफ काढणे सोपे आणि वेगवान होईल.