
सध्या सोशल मीडियावर एक अरबांच्या लग्नातला एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती हातामध्ये एक पेटी घेऊन ती लग्नाला आलेल्या पाहुण्यांच्या समोर धरत आहे. या पेटीत सोन्याची बिस्किटे ठेवलेली आहेत. व्हिडीओ ‘एक्स’वर @Rainmaker1973 या युजरने शेअर केला आहे. खरंच ही सोन्याची बिस्किटे आहेत का, असा सवाल नेटीजन्सला पडला आहे. अशातच व्हायरल व्हिडीओचे सत्य उघड झाले आहे. ही सोन्याची बिस्किटे नसून लक्झरी चॉकलेट्स आहेत. ही मध्यपूर्वेतील प्रसिद्ध ‘पॅची’ या प्रीमियम चॉकलेट ब्रँडची ही चॉकलेट्स हुबेहूब सोन्याच्या बिस्किटांसारखी दिसतात.






























































