
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिस अटेंडंट या पदाच्या नोकरभरतीसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. त्या परीक्षेत जास्तीत जास्त उमेदवार यशस्वी व्हावेत यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने दादर येथील शिवसेना भवनात प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थानीय लोकाधिकर समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई, महासंघाचे कार्याध्यक्ष विलास पोतनीस, आमदार सुनील शिंदे, सरचिटणीस प्रदीप मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली 10 दिवस हे प्रशिक्षण वर्ग चालवण्यात येणार आहेत. त्या प्रशिक्षण वर्गांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी 21 फेब्रुवारीपर्यंत शिवसेना भवन येथे रविवार व सुट्टीचे दिवस वगळून शरद एक्के (9892699215), श्रीराम विश्वासराव (9869588469), विलास जाधव (9619118999), सुधाकर नर (8369442951) यांच्याशी सायंकाळी 5 ते रात्री 8.30 या वेळेत संपर्प साधावा, असे आवाहन महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.
























































