
हिंदुस्थान-अमेरिका करारावरून काँग्रेसने मोदी सरकारवर आज पुन्हा हल्ला चढवला. ‘हा करार शेतकऱयांच्या उपजीविकेवर घाला घालणारा असून देशाच्या ऊर्जा सुरक्षेशी तडजोड करणारा आहे. अनेक गोष्टींसाठी आपल्याला आता अमेरिकेवर अवलंबून राहावे लागणार आहे’ असे सांगतानाच, ‘हा देश आत्मनिर्भर आहे की अमेरिका निर्भर,’ असा खोचक सवाल काँग्रेसचे खासदार रणदीप सुरजेवाला यांनी केला.
दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. व्यापार करारात अमेरिकेकडून 500 अब्ज डॉलरची आयात करण्याची अट हिंदुस्थानवर लादण्यात आली आहे. आतापर्यंत आपली आयात कमी आणि निर्यात जास्त असे चित्र होते. आता उलट होणार आहे. हिंदुस्थानच्या हितासाठी ठाम भूमिका घेण्याऐवजी तथाकथित मजबूत सरकारने सपशेल शरणागती पत्करली आहे,’ अशी टीका सुरजेवाला यांनी केली.
संत्री, स्ट्रॉबेरीही अमेरिकेतून येणार
‘या करारामुळे हिंदुस्थानातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार असल्याचे सुरजेवाला म्हणाले. करारानुसार, सफरचंद, संत्री, चेरी, नासपती आणि स्ट्रॉबेरीसारखी फळेदेखील आता अमेरिकेतून येणार आहेत. अशा परिस्थितीत फळ उत्पादक शेतकऱयांचे काय होणार,’ असा सवाल सुरजेवाला यांनी केला.
मोदी थकलेही आणि झुकलेही!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत पेंद्रीय अर्थसंकल्पाचे काwतुक केले. तसेच, विकसित भारताचे दावे केले. या मुलाखतीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी जोरदार टीका केली. ‘यंदाचा अर्थसंकल्प निराशाजनक होता. बाजाराच्या प्रतिक्रिया नकारात्मक होत्या. गुंतवणूकदारही खूश नाहीत हे मोदींना माहीत आहे. त्यामुळेच मोदींना ही मुलाखत द्यावी लागली. अमेरिकेशी करारावरून होत असलेल्या टीकेवर लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. ही मुलाखत नसून प्रतिमा संवर्धनाची केविलवाणी धडपड आहे. प्रत्यक्षात पंतप्रधान झुकलेही आहेत आणि थकलेही आहेत,’ असा टोला रमेश यांनी हाणला.



























































