
काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्धचा मानहानीचा कर्नाटक उच्च न्यायालयाने आज खटला रद्द केला. हा खटला 2023 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘40 टक्के कमिशन’च्या काँग्रेसच्या जाहिरातींसंदर्भात होता. भाजप नेत्याच्या तक्रारीवरून खटला दाखल करण्यात आला होता.
कर्नाटकमध्ये 2023 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी भ्रष्टाचारावरून तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर आरोप केले होते. यानंतर काँग्रेसने ‘पेसीएम’ असे पोस्टर्स ठिकठिकाणरी लावले होते. तसेच ‘करप्शन रेट कार्ड’ असलेल्या जाहिरातीला राहुल गांधी यांनीही सोशल मीडियावर शेअर केले होते. याबाबत भाजप नेते केशव प्रसाद यांनी राहुल गांधी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
Relief for Rahul Gandhi: Karnataka HC Quashes Defamation Case Over ‘40% Commission’ Ad
The Karnataka High Court has quashed a defamation case against Rahul Gandhi regarding Congress’s “40% Commission” advertisement during the 2023 polls.























































