
सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक स्टंट करणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाला उत्तर-पूर्व दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. हा तरुण चालत्या बसचे दरवाजे उघडून प्रवाशांना त्रास देत असल्याचे समोर आले होते. तुषार पुनिया (रा. खजुरी खास) असे या आरोपीचे नाव आहे.
१६ फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. यामध्ये एक तरुण विना क्रमांकाच्या दुचाकीवरून भरधाव वेगात जात असल्याचे दिसत होते. धक्कादायक म्हणजे, हा तरुण ट्रॅफिकमध्ये चालत्या वाहनांचे, विशेषतः ‘डीटीसी’ (DTC) बसचे दरवाजे ओढून ते उघडत होता. या कृत्यामुळे केवळ त्याचाच जीव धोक्यात नव्हता, तर बसमधील प्रवासी आणि रस्त्यावरील इतर वाहनचालकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला होता.
पोलिसांची कारवाई
🔶 सड़क नियमों को ताक पर रखने वालों के खिलाफ कार्रवाई।
🔸 वायरल वीडियो पर संज्ञान लेते हुए थाना न्यू उस्मानपुर ने न्याय संहिता की धारा 281 और MV एक्ट के तहत स्टंटबाजों के खिलाफ कसा सिकंजा। #DPUpdates#ViralVideo pic.twitter.com/FociYbmmve
— Delhi Police (@DelhiPolice) February 17, 2026
या व्हायरल व्हिडिओची दखल घेत न्यू उस्मानपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला पकडण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि व्हिडिओचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपीची ओळख पटवली. अथक परिश्रमानंतर तुषारला अटक करण्यात आली असून, गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.
ओळख लपवण्यासाठी शक्कल
तपासादरम्यान असे समोर आले की, स्टंट करताना आपली ओळख पटू नये म्हणून तुषारने त्याच्या दुचाकीची नंबर प्लेट मुद्दाम काढून टाकली होती. तो अत्यंत धोकादायक पद्धतीने ट्रॅफिकमधून दुचाकी चालवत होता आणि अचानक वाहनांचे दरवाजे उघडून दहशत निर्माण करत होता.
यापूर्वीही त्याने अशा प्रकारचे स्टंट केले आहेत का, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
Delhi Biker Arrested for Opening Doors of Moving Buses for Social Media Reels
A 22-year-old biker in Delhi was arrested after a viral video showed him performing dangerous stunts and opening doors of moving DTC buses to shoot reels.
























































