
पंजाबमधील एका लग्नसोहळ्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय. लग्न सोहळ्यात वराने वधूवर तब्बल 8.5 कोटी रुपयांचा वर्षाव केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जातोय. मोठय़ा प्रमाणात टीका होतेय. व्हिडीओमध्ये वराकडून वधूवर नोटांचा वर्षाव करण्यात येत असल्याचे दिसतेय. जमिनीवर नोटाच नोटा पसरलेल्या दिसत आहेत. नवरदेवाच्या कुटुंबाने मात्र हा दावा फेटाळला आहे. नवरदेवाचा भाऊ सिपंदर सिंग यांनी म्हटले की, माझा भाऊ ऑस्ट्रेलियामध्ये ट्रक व्यवसाय करतो. 14 फेब्रुवारी रोजी लग्न झाले असून आम्ही लग्न पैशांचा वर्षाव करून साजरे केले. पण ते फक्त 2 लाख रुपये होते. मात्र सोशल मीडियावर कोटींमध्ये आकडे सांगितले जात आहेत ते चुकीचे आहेत.


























































