
स्वयंपाकात तिखट जास्त झाल्यास दह्याचे, दुधाचे किंवा साखरेचे प्रमाण वाढवून तिखटपणा कमी करता येतो. रस्सा भाज्यांमध्ये उकडलेला बटाटा किंवा भाजलेले शेंगदाणे कुटून टाकल्याने चव संतुलित होते, लिंबाचा रस किंवा कांदाही घालू शकता.
भाजी किंवा डाळीवर वरून थोडे तूप टाकल्यानेदेखील जळजळ कमी होण्यास मदत होते. रस्सा भाजीमध्ये थोडे तांदळाचे पीठ किंवा बेसन भाजून टाकल्यास तिखटपणा कमी होतो. तिखट खूपच जास्त झाले असेल, तर पदार्थ परत बनवा.





























































