
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) युगात मानवी मूल्यांचे रक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ मध्ये हिंदुस्थानचे ‘मानव’ (MANAV) व्हिजन जगासमोर मांडले. ‘एआय हे केवळ मशीन-केंद्रित नसून ते मानवकेंद्रित असावे, हाच आमचा मूळ उद्देश आहे’, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
पंतप्रधानांनी ‘MANAV’ या शब्दाचा अर्थ सविस्तर स्पष्ट केला. M (Moral and Ethical): एआय प्रणाली नैतिक मूल्यांवर आधारित असावी, A (Accountable): पारदर्शक नियम आणि उत्तरदायी प्रशासन, N (National Sovereignty): ज्याचा डेटा, त्याचा अधिकार (राष्ट्रीय सार्वभौमत्व), A (Accessible): एआय ही कोणा एकाची मक्तेदारी नसून सर्वांसाठी सर्वसमावेशक असावी, V (Valid and Legitimate): एआयचा वापर कायदेशीर आणि पडताळणी करण्यायोग्य असावा.
#WATCH | Delhi: At the #IndiaAIImpactSummit2026, Prime Minister Narendra Modi says, “Today at the New Delhi AI Impact Summit, I present the MANAV Vision for AI. MANAV means human, and MANAV Vision says M- moral and ethical systems: AI should be based on ethical guidance. A-… pic.twitter.com/KR3rz8pGet
— ANI (@ANI) February 19, 2026
डीपफेकचा धोका आणि विश्वासार्हता
पंतप्रधानांनी ‘डीपफेक’ आणि बनावट कंटेंटमुळे समाजाच्या स्थैर्याला निर्माण होणाऱ्या धोक्याबद्दल इशारा दिला. ‘डिजिटल जगात विश्वासार्हता महत्त्वाची आहे. एआयद्वारे तयार केलेल्या मजकूर, प्रतिमा किंवा व्हिडिओवर ‘वॉटरमार्किंग’ आणि स्त्रोताची स्पष्ट ओळख असणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या सुरुवातीपासूनच त्यात विश्वास निर्माण करणारी यंत्रणा हवी’, असे मोदी म्हणाले.
ग्लोबल साउथ आणि लोकशाहीकरण
‘AI साठी मानव केवळ एक ‘डेटा पॉइंट’ असू नये. माणसाला कच्च्या मालासारखे वागवले जाऊ नये यासाठी एआयचे लोकशाहीकरण होणे गरजेचे आहे. विशेषतः ‘ग्लोबल साउथ’ (विकसनशील देश) मधील लोकांसाठी ते सक्षमीकरणाचे माध्यम बनावे’, असे आवाहन त्यांनी केले.
जीपीएस (GPS) चे उदाहरण
AI वर मानवी नियंत्रण असावे, हे पटवून देण्यासाठी त्यांनी जीपीएसचे उदाहरण दिले. पंतप्रधान म्हणाले, ‘आपण एआयला मोकळे आकाश दिले पाहिजे, पण त्याची सूत्रे (Command) आपल्याच हातात हवीत. ज्याप्रमाणे जीपीएस आपल्याला रस्ता दाखवते, पण नेमके कुठे जायचे, याचा अंतिम निर्णय आपला असतो, तसेच एआयचे असावे.’ जर एआयला योग्य दिशा मिळाली तर ते समस्यांचे समाधान बनेल, अन्यथा ते विनाशाला कारणीभूत ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला.
saamana news: pm modi presents manav vision for ai at impact summit 2026
prime minister narendra modi unveils human-centric manav vision for ai. read more on saamana about pm’s warning on deepfakes and ai governance.


























































