निर्मात्याने अखेर ‘घुसखोर पंडत’ नाव हटवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मनोज वाजपेयीचा आगामी ‘घुसखोर पंडत’ या चित्रपटाचे नाव हटवण्यात आले आहे. चित्रपट निर्माता नीरज पांडे यांनी आज सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही माहिती दिली. चित्रपटाचे वादग्रस्त शीर्षक काढून टाकण्यात आले आहे. आता त्याचा कुठेही वापर केला जाणार नाही. नवीन नाव अद्याप निश्चित झालेले नाही, परंतु जे काही ठेवले जाईल ते जुन्या नावासारखे मिळतेजुळते नसेल, असे या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.