
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात कोकण पर्यावरण संघर्ष समितीच्या माध्यमातून लवकरच भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती माजी खासदार हुसेन दलवाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. या आंदोलनाच्या तयारीसाठी गावागावांत सुरू असलेल्या बैठकांना ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. दलवाई म्हणाले, ‘‘सरकार व अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच ही कंपनी सुरू झाली असून येथे घातक उत्पादन घेतले जात आहे. याची पूर्ण कल्पना सरकारला आहे. काही दिवसांपूर्वी येथे भेट दिलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंपनी कोकणसाठी हानिकारक ठरत असल्यास ती बंद केली जाईल, असे सांगितले.


























































