
हिंदुस्थानच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहीम ‘गगनयान’ साठी ड्रोग पॅराशूटची पात्रता चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली. पात्रता चाचणीत कमाल उड्डाण भारापेक्षा जास्त भार टाकून पॅराशूटची मजबुती आणि सुरक्षा मार्जिन तपासले गेले. मानवी अंतराळात मोहीमेतील हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे डीआरडीओने आज सांगितले. ‘गगनयान’ मोहिमेत अंतराळवीरांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणण्यासाठी ड्रोग पॅराशूट खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा कॅप्सूल पृथ्वीच्या वातावरणात परत येतो तेव्हा हेच पॅराशूट त्याची वेगवान गती कमी करण्यास मदत करते. ही चाचणी बुधवारी चंडिगड येथील टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च लॅबोरेटरीच्या रेल ट्रक रॉकेट स्लेड सुविधेत करण्यात आली.






























































