चंद्रपूरमध्ये विद्यार्थिनीच्या विनयभंगप्रकरणी शिक्षकाला अटक; घटनेने परिसरात खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर शहरातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या लोकमान्य टिळक कन्या विद्यालयातील एका शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी आरोपी शिक्षक गोवर्धन गोंडाने (५१) याला पोक्सो कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे. पीडित मुलगी ही आठवीत शिकत आहे. पाच ते सहा विद्यार्थिनींनी शिक्षकाविरोधात पोलिसात तक्रार केली आहे. शहर पोलिसांनी तत्काळ दखल घेत आरोपी गोंडानेला अटक केली. पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.