
टाटा मोटर्सने आपली बहुप्रतीक्षित टाटा पंच ईव्ही फेसलिफ्ट अखेर मार्पेटमध्ये लाँच केली. या कारची सुरुवातीची किंमत 9.69 लाख रुपये आहे. तर याच्या टाॅप व्हेरियंटची किंमत 12.59 लाख रुपयांपर्यंत आहे. या कारची बुकिंग ऑनलाईन आणि डीलरशीप अशा दोन्हींकडे सुरू करण्यात आली आहे. या कारमध्ये 40 केडब्ल्यूएच बॅटरी पॅक दिला असून यानुसार, या कारची रेंज 468 किलोमीटर आहे. तर रोजच्या वापरातील रेंज 355 किमी आहे. 15 मिनिटांच्या चार्ंजगमध्ये ही कार 135 किमी धावू शकते, असा कंपनीचा दावा आहे. या कारमध्ये 6 एअरबॅग, 10 इंचाचा इन्फोटेंनमेंट स्क्रीन, अॅपल कार प्ले, ऑटोमॅटिक क्लाइमेट कंट्रोल, व्हाईस असिस्टेंट, 360 डिग्री कॅमेरासह अनेक भारी फिचर्स दिले आहेत.


























































