रेल्वेत अप्रेंटिसच्या 5 हजार 349 पदांसाठी भरती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वे रिक्रूटमेंट सेल (आरआरसी) पश्चिम रेल्वेमध्ये एकूण 5 हजार 349 अप्रेंटिस पदांसाठी भरती करणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया उद्या, 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईट https://www.rrc-wr.com वर देण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार किमान 50 टक्क्यांनी 10 वी उत्तीर्ण असावा. त्यांच्याकडे मान्यताप्राप्त संस्थेतील आयटीआयचे प्रमाणपत्र असायला हवे. अर्ज करणाऱया उमेदवारांची निवड कागदपत्रांची पडताळणी आणि गुणवत्तेच्या आधारावर शॉर्ट लिस्टिंग केली जाणार आहे.