ब्रिटनमध्ये पहिल्यांदा कॅबिनेट सचिवपदी महिला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी एंटोनिया रोमियो यांची कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. कॅबिनेट सचिवपदी पोहोचणाऱया त्या पहिल्या महिला आहेत. एंटोनिया रोमिया या आता कॅबिनेट सचिवपदी विराजमान झाल्यानंतर पंतप्रधानांच्या मुख्य नीती सल्लागार म्हणून काम करतील. ब्रिटनमध्ये कॅबिनेट सचिव सर्वात वरिष्ठ नागरी सेवक असतो. रोमियो या क्रिस वर्मल्ड यांची जागा घेतील. क्रिस यांनी काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत पीटर मँडेलनसन यांची ब्रिटिश राजदूत म्हणून नियुक्ती झाल्यानंतर वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांना आपले पद सोडावे लागले.