
इस्रायलमधील दक्षिण शहर एश्केलोनमध्ये कामासाठी गेलेल्या दोन हिंदुस्थानी मजुरांवर हल्ला करण्यात आला आहे. इस्रायली पोलिसांनी हल्लेखोराला तत्काळ अटक केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात इस्रायलचा दौरा करण्याची शक्यता आहे. त्याआधीच हिंदुस्थानी मजुरावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडल्याने या हल्ल्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. एका सार्वजनिक पार्कात उभ्या असलेल्या दोन मजुरांवर तीन जणांच्या जमावाने अचानक हल्ला केला. या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडिया आणि टीव्ही चॅनेलवरून दाखवण्यात आला आहे. हल्लेखोरांनी आधीच हल्ला करण्याचे ठरवलेले व्हिडीओत दिसत आहे.


























































