
मेघायलयमध्ये व्हॉईस ऑफ द पीपल पार्टीचे (व्हीपीपी) शिलाँग येथील खासदार रिकी एजे सिंग्कॉन यांचे फुटबॉल खेळत असताना हृदयविकारामुळे निधन झाले. त्यांना सार्वजनिक आरोग्य पेंद्रात लगेच नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टर उपलब्ध नव्हते. त्यामुळे गोल्डन अवरमध्ये त्यांना उपचार मिळाले नाही. यावरून राज्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सिंग्कॉन यांना गुरुवारी मित्रांसोबत फुटबॉल खेळत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ते मैदानावर कोसळले. त्यांना मावियोंग सार्वजनिक आरोग्य पेंद्रात नेण्यात आले. तेथे डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे त्यांना जाईआव येथील डॉ. एच. गॉर्डन रॉबर्ट्स रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तेथे सिंग्कॉम यांचा रात्री मृत्यू झाला.


























































