साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 22 फेब्रुवारी 2026 ते शनिवार 28 फेब्रुवारी 2026

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलिमा प्रधान

मेष – कामाचे नियोजन करा

मेषेच्या एकादशात मंगळ, सूर्य चंद्र लाभयोग. प्रत्येक दिवस यश देणारा आहे. त्यामुळे कामांचे योग्य नियोजन करा. नोकरीधंद्यात वर्चस्व राहील. किचकट कामे करून घ्या. कोर्टकेस संपवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता वाढेल. शुभ दि. 25, 26

वृषभ – कार्याची आखणी करा

वृषभेच्या दशमेषात मंगळ, शुक्र गुरू त्रिकोणयोग. दिग्गज व्यक्तींच्या परिचय फायदेशीर ठरेल. कार्याची आखणी करून ध्येय गाठता येईल. नोकरीधंद्यात जम बसवा. कर्जाचे काम करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रभाव वाढेल. शुभ दि. 26, 27

मिथुन – मोठे यश मिळवाल

मिथुनेच्या भाग्येषात मंगळ, सूर्य चंद्र त्रिकोणयोग. सप्ताहाच्या पूर्वार्धात मोठे यश मिळवाल. नविन परिचयावर योग्य विचार करून कामे करून घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे कौतुकास्पद ठरतील. पद मिळेल. शुभ दि. 27, 28

कर्क – गैरव्यवहारात फसू नका

कर्केच्या अष्टमेषात मंगळ, चंद्र शनि लाभयोग. गैरव्यवहारात फसू नका. कोणतेही वैर पत्करू नका.प्रवासात सावध रहा. कायद्याच्या कक्षा पाळा. अनुचित प्रकार टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात संयम बाळगा. वाहन जपून चालवा. शुभ दि. 22,23

सिंह – कामे रेंगाळत ठेऊ नका

सिंहेच्या सप्तमेषात मंगळ, शुक्र, गुरू त्रिकोणयोग. सप्ताहाच्या सुरूवातीपासून कामे सुरू करा. कठीण कामे रेंगाळत ठेऊ नका. मैत्री वाढवण्यात यश. नोकरीत कामाची प्रशंसा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकसंग्रह वाढवा. शुभ दि. 22, 25

कन्या – मैत्रीत गैरसमज होतील

कन्येच्या षष्ठेशात मंगळ, बुध, शुक्र युती. भावनेच्या आहारी जाऊ नका. नोकरीधंद्यात जास्त सावध रहा. गैरव्यवहारात फसू नका. नवीन ओळख नुकसानदायी ठरेल. नातेसंबंध, मैत्रीत गैरसमज होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप होतील. शुभ दि. 24, 25

तूळ – नवी संधी लाभेल

तुळेच्या पंचमेषात मंगळ, सूर्य चंद्र लाभयोग. क्षुल्लक अडचणींचा बाऊ न करता प्रयत्नांनी कठीण कामे करून घ्या. तुमच्या क्षेत्रात नवी संधी लाभेल. नोकरीधंद्यात जम बसेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांना गती मिळेल. शुभ दि. 22, 26

वृश्चिक – वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा

वृश्चिकेच्या सुखेशात मंगळ, बुध शुक्र युती. तुम्ही fिदलेले आश्वासन त्रासदायक ठरण्याची शक्यता.वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. नोकरीत वरिष्ठांना मदत करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. कायदा पाळा. शुभ दि. 24, 25

धनु – चातुर्याने कामे करा

धनुच्या पराक्रमात मंगळ, बुध शुक्र युती. अडचणींवर मात करून चातुर्याने कामे करा. रागाने नुकसान होईल. नोकरीधंद्यात अडचणी येतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांच्या मनात विष पेरण्याचे काम होईल. यश मिळवाल. शुभ दि. 26, 27

मकर – सहकारी वर्गाला मदत कराल

मकरेच्या धनेषात मंगळ, बुध शुक्र युती. प्रत्येक दिवस महत्त्वाचा ठरेल. दिग्गज व्यक्तींचा सहवास लाभेल. प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल. नोकरीत सहकारी वर्गाला मदत कराल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मुद्दे योग्य ठरतील. कौतुक होईल. शुभ दि. 24, 28

कुंभ – नोकरीत अहंकार नको

स्वराशीत मंगळ, शुक्र गुरू त्रिकोणयोग. दगदग, धावपळ होईल. जिद्दीने यश मिळवाल. नोकरीत अहंकार नको. स्पर्धा करणारे वाढतील. धंद्यात वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न होईल. शुभ दि. 22, 26

मीन – वाहनाचा वेग कमी ठेवा

मीनेच्या व्ययेषात मंगळ, बुध शुक्र युती. क्षेत्र कोणतेही असो रागावर ताबा ठेवा. नविन परिचयावर भाळून जाऊ नका. व्यवहार त्रासदायक ठरू शकतो. प्रकृतीची काळजी घ्या. वाहनाचा वेग कमी ठेवा. चौफेर सावध रहा. तटस्थ रहा. शुभ दि. 22, 28