
166 कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळाप्रकरणी मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने एका आरोपीला दिलासा दिला आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. मात्र खटला विहीत वेळेत पूर्ण होण्याची शक्यता धूसर असून, आरोपीला तुरुंगात ठेवण्याची आवश्यकता नाही असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर आरोपीची सुटका केली.
बनावट इनव्हॉइसेस तयार करून सुमारे 166.37 कोटी रुपयांचा चुकीचा इन्पुट टॅक्स व्रेडिट मिळवून दिल्याच्या आरोपावरून राजेंद्र मौर्य याच्यावर सीजीएसटी कायदा 2017 च्या कलम 132(1)(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याने जामिनासाठी अॅड. गणेश गुप्ता यांच्यामार्फत याचिका दाखल केली. या याचिकेवर एस्प्लनेड कोर्टाचे दंडाधिकारी एस.के. पह्कमारे यांच्यासमोर सुनावणी झाली.
























































