रांचीहून दिल्लीला जाणारी एअर अँब्युलन्स कोसळली; रुग्ण, चालक दलासह 7 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
7 Killed as Air Ambulance Crashes in Jharkhand Near Ranchi

झारखंडची राजधानी रांची येथील बिरसा मुंडा विमानतळावरून दिल्लीकडे निघालेल्या खासगी चार्टर एअर अँब्युलन्सचा भीषण अपघात झाला आहे. हे विमान झारखंडमधील चतरा जिह्यातील सिमरिया गावाजवळ कोसळले. त्यात चालक दलासह 7 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटनास्थळी एअरक्राफ्ट एक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचे (एएआयबी) पथक दाखल झाले असून अपघाताचा तपास सुरू करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, रेडबर्ड एअरवेज प्रायव्हेट लिमिटेडचे बीचक्राफ्ट सी-90 विमान दिल्ली येथे संजय कुमार (41) नावाच्या एका 65 टक्के जळालेल्या रुग्णाला घेऊन जात होते. ते 16 फेब्रुवारीला एका घटनेत जळाले होते. त्यांच्या कुटुंबियांनी दिल्ली येथे नेण्यासाठी एअर अँब्युलन्सची सोय केली होती. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक अर्चना देवी, धुरु कुमार, डॉक्टर विकास गुप्ता आणि वैद्यकीय सहाय्यक सचिन कुमार मिश्रा हे होते. या सर्वांसह वैमानिक विवेक भगत आणि सबराजदीप सिंह यांचा मृत्यू झाला.

विमानाने सायंकाळी 7.11 वाजता रांचीहून उड्डाण केले. त्यानंतर 20 मिनिटांनी ते कोसळले. सिमरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खासियातू करमटांड जंगलात विमानाचे अवशेष आढळून आले.

7 Killed as Air Ambulance Crashes in Jharkhand Near Ranchi

A private charter air ambulance carrying a burn patient crashed in Jharkhand’s Chatra district, killing all seven people on board.