
दिल्लीहून लेहसाठी उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच स्पाइसजेटच्या विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने विमान पुन्हा दिल्ली विमानतळाकडे वळवण्यात आले. मंगळवारी सकाळी ही घटना घडली. लेहसाठी उड्डाण केल्यानंतर एका तासाच्या आत स्पाइसजेटचे बोईंग 737 विमान दिल्लीला परतले. विमानात एकूण 150 प्रवासी होते.
स्पाइसजेटच्या बोईंग 737 SG121 या विमानाने मंगळवारी सकाळी 6 वाजून 8 मिनिटांनी रांचीच्या दिशेने उड्डाण केले. त्यानंतर इंजिनमध्ये बिघाड झाल्याने सकाळी 6 वाजून 49 मिनिटांनी दिल्ली विमानतळावर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. कॉकपिटमध्ये आगीची कोणतीही सूचना नव्हती, असे स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले.





























































