
शेअर बाजार मंगळवारी जोरदार आपटला आहे. आजचा दिवस गुंतवणूकदारांसाठी खऱ्या अर्थाने ‘अमंगल’वार ठरला आहे. सेन्सेक्स 1068 अंकांनी घसरून 82,225 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 288 अंकांनी घसरून 25,424 अंकांवर बंद झाला.
शेअर बाजार गडगडल्याने गुंतवणूकदारांना जबर फटका बसला असून त्यांना तब्बल 3 लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. आयटी सेक्टरमध्ये पुन्हा एकदा जोरदार विक्रीचा फटका गुंतवणूकदारांना बसला आहे. एआयमुळे होणारी अडचण आणि अमेरिकेत वाढलेले व्याजदरांच्या चिंतेने निफ्टीतील आयटी इंडेक्समध्ये 5 टक्के घसरण झाली. फेब्रुवारीमध्ये आतापर्यंत 21 टक्के घसरण झाली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात न्यूक्लियर चर्चेच्या तिसऱ्या फेरीआधी कच्च्या तेलाच्या किमतीत 1 टक्का वाढ झाली आहे.



























































