
जमा केलेल्या सायीपासून झटपट साजूक तूप करण्यासाठी मोठ्या तोंडाचे, जाड तळाचे स्टीलचे भांडे घ्या. पातेल्यातील सायीवर स्टीलचा ग्लास उपडी ठेवा. ग्लास हाताने गोल गोल फिरवत सायीवर दाबा. सतत दाबल्याने सायीचे गोळे तयार होऊ लागतात.
त्यातील पाणी वेगळे होऊन लोणी तयार होऊ लागते. हे करताना वेळ जातो, पण मिक्सरचा वापर न झाल्याने लोण्याला एक वेगळीच चव येते. पांढरेशुभ्र लोणी बाहेर आले की हाताने त्याचा गोळा करा. तो मंद आचेवर गरम करून तूप करा.
Quick and Easy Way to Make Homemade Pure Ghee Without a Mixer
Discover a simple traditional trick using a steel glass to extract butter from cream quickly and make authentic homemade pure ghee at home.






























































