
- मुंबई शहरात भाड्याने घर देणे मोठ्या जिकिरीचे काम आहे. भाड्याने घर देताना काही घरमालक कायदेशीर बाबींचा विचार करत नसल्यामुळे ते अडचणीत सापडतात.
- कोणत्याही घरमालकाने घर भाड्याने देताना सर्व प्रक्रिया ही कायदेशीर करणे गरजेचे आहे. करारनामा संपूनही भाडेकरू घराबाहेर पडत नसेल तर काही गोष्टी करा.
- सर्वात आधी भाडेकरूला जबरदस्तीने घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करू नका. उलट त्याला वकिलामार्फत घर सोडण्यासाठी कायदेशीर नोटीस तत्काळ पाठवा.
- भाडेकरूने नोटीस मिळाल्यानंतरही घर सोडले नाही, तर घरमालक न्यायालयात भाडेकरूच्या विरोधात बेदखल करण्यासाठी दावा दाखल करू शकतात.
- घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील भाडे करार महत्त्वाचा आहे. करारामध्ये नमूद केलेल्या अटींचे पालन करणे दोघांसाठीही बंधनकारक असते.



























































