
जागतिक संकेत आणि इराण-अमेरिका, तसेच पाकिस्तान-अफगाणिस्तानमधील तणाव याचा दबाव हिंदुस्थानच्या शेअर बाजारावर दिसत आहे. शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी-50मध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स तब्बल 600 अंक, तर निफ्टी 200 हून अंकांनी घसरला. यामुळे गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले.
शुक्रवारी बाजाराची सुरुवातच नकारात्मक झाली. विक्रीचा सपाटा सुरू झाल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये दबाव दिसला. दुपारी एकच्या सुमारास सेन्सेक्स 600 हून अधिक अंकांच्या घसरणीसह 81,650 च्या खाली पोहोचला. तर निफ्टी-50 निर्देशांकही 212 अंकांच्या घसरणीसह 25,300 च्या खाली गेला.
टॉप गेनर शेअर (दुपारी एकपर्यंत)
ट्रेंट – 1.48 टक्के
इन्फोसिस – 1.40 टक्के
एचसीएल टेक – 1.35
अपोलो हॉस्पिटल – 1.14 टक्के
एटर्नल – 0.79 टक्के
टॉप लूजर शेअर (दुपारी एकपर्यंत)
भारती एअरटेल – 2.88 टक्के
डॉ. रेड्डी – 2.49 टक्के
एचडीएफसी लाईफ – 2.40 टक्के
श्रीराम फायनान्स – 2.37 टक्के
ग्रासीम – 2.28 टक्के
पाकिस्तानचा शेअर बाजार कोसळला
दरम्यान, अफगाणिस्तानसोबत युद्धाचा भडका उडाल्यानंतर पाकिस्तानचा शेअर बाजारही कोसळला. कराची 100 निर्देशांकातही घसरण झाली. केएसई तब्बल 962 अकांनी कोसळून 1, 67,930 वर पोहोचला.






























































