Beed News – वाल्मीक कराडच्या मुलाची सोशल मीडियावर सूचक पोस्ट, सुशिल कराड काय बोलणार याकडे लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संतोष देशमुख हत्याकांडाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. यातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्यासह पाच जणांना अटकही करण्यात आली. यातील एक आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. जामीनसाठी वाल्मीक कराड याने अनेकदा अर्ज केले. अखेर सर्वोच्च न्यायालयानेही त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कराड कुटुंब आक्रमक झाले. समाज माध्यमावर एक सूचक संदेश पाठवत आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार असे म्हटल्याने सर्वांचे लक्ष सुशिल कराडच्या भूमिकेकडे लागले आहे. सुशिल कराड नेमकी कोणती माहिती उघड करणार, कोणता खुलासा समोर येणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

वाल्मीक कराड याचा मोठा मुलगा सुशिल कराड याने सोशल मीडियावर आज एक पोस्ट व्हायरल केली. त्यात आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार अशा आशयाची फेसबुक पोस्ट व्हायरल केली. सुशिल कराड नेमके कोणत्या मुद्द्यावर बोलणार, कोणती माहिती आणि कोणता खुलासा करणार याकडे बीड जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.

सुशिल कराडची ही पोस्ट नेमकी कोणत्या संदर्भात आहे याबाबतही थोडा संभ्रम आहे. कारण दोन दिवसांपूर्वीच वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला याबाबत आहे की आज परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या निर्घुण हत्या प्रकरणी संशयितांची नार्को टेस्ट घेण्यात आली होती. त्या नार्को टेस्टचा अहवाल एसआयटीकडे प्राप्त झाला आहे. आज शनिवारी न्यायालयासमोर एसआयटी हा अहवाल उघडणार आहे. त्यामुले सुशिल कराड नेमका खुलासा वाल्मीक कराडच्या जामिन अर्जाबाबत करणार आहे की, महादेव मुंडे यांच्या खुनातील आरोपीच्या नार्को टेस्टबाबत करणार आहे हे लवकरच समोर येईल.