
- पुरणपोळी करताना काही गोष्टी लक्षात ठेवा, जेणेकरून पुरणपोळी अगदी परफेक्ट लाटली जाईल. पुरणपोळी करताना चण्याची डाळ 2 ते 3 तास पाण्यात घालून भिजत ठेवा आणि नंतर ती शिजवा. असं केल्याने डाळ मऊसूत शिजते.
2. कणिक अगदी मऊसूत भिजवली आणि पुरण एकजीव केलं तर पुरणपोळी लाटताना ती फुटण्याची शक्यता खूप कमी होते. कणकेचा गोळा घेतल्यानंतर तो अगदी थोडा लाटावा आणि त्यात पुरण भरावं. पोळी लाटताना काठाकाठाने लाटत जावी.





























































