
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी तामीळनाडूच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. ‘एआयएडीएमके’ पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी आज सत्ताधारी डीएमके पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी त्यांना सदस्यत्व दिले.
पुढीन 2 महिन्यांमध्ये तामीळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची अपेक्षा आहे. त्यापूर्वी पनीरसेल्वम हे डीएमकेमध्ये सामील झाल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात आणि आगामी निवडणुकांवरही याचा परिणाम होऊ शकतो. पनीरसेल्वम हे एकेकाळी दिवंगत माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांचे निकटवर्तीय होते. ते वर्ष 2001, 2014 आणि 2016 मध्ये तामीळनाडूचे मुख्यमंत्री राहिले होते.

























































