थलपती विजयचे विवाहबाह्य संबंध असल्याचा पत्नीचा आरोप, जोडले या अभिनेत्रीचे नाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तमिळ सुपरस्टार थलपती विजय यांचे वैयक्तिक आयुष्य चर्चेत आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार थलपतीची पत्नी संगीता सोर्नालिंगम यांनी 24 फेब्रुवारीला चेंगलपट्टू फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. या याचिकेत विजयवर एका अभिनेत्रीसोबत अवैध संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यादरम्यान, अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांचे नाव विजयच्या घटस्फोटाशी जोडले जात आहे. अनेकजन इंटरनेटवर याचे पुरावे असल्याचा दावाही करत आहेत.

Siyasat.com च्या वृत्तानुसार तिच्या याचिकेत थलापती विजयची पत्नी संगीता हिने दावा केला आहे की तिला एप्रिल 2021 मध्ये विजयचे एका अभिनेत्रीसोबत अनुचित संबंध असल्याचे आढळले. जरी तिने तिच्या याचिकेत अभिनेत्रीचे नाव घेतले नसले तरी, सोशल मीडियावरील अफवा त्रिशा कृष्णनकडे निर्देश करतात, ज्यांनी गिल्ली आणि आथी सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये विजयसोबत काम केले आहे. या आरोपांमुळे तमिळ चित्रपटसृष्टी आणि विजयच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

त्रिशाने इन्स्टाग्रामवर केलेल्या एका पोस्टनंतर त्रिशा आणि विजय यांच्यातील अफेअरच्या अफवांना उधाण आले. तिच्या पोस्टमध्ये अभिनेत्रीने लिहिले की, “जेव्हा तुम्ही प्रेमाने भरलेले असता तेव्हा ते मूर्खपणाने भरलेल्यांना गोंधळात टाकते.” त्यानंतर विजयच्या वाढदिवसाच्या पोस्टमध्ये त्यांचा एकत्र फोटो होता, ज्यामुळे त्यांच्या नात्यातील अफवांना आणखी बळकटी मिळाली. चाहत्यांनी गिल्लीमधील त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीवर त्वरित टिप्पणी केली आणि त्यांना टाइमलेस जोडपे म्हटले आहे. शिवाय, विजयने एका कार्यक्रमात त्रिशाला राजकुमारी असे संबोधले होते. त्रिशा आणि विजय दोघांनीही वैयक्तिक सहभाग नाकारला असला तरी, आता त्रिशाचे नाव अभिनेत्याच्या घटस्फोटाशी जोडले जात आहे.