नियम मोडणाऱ्या चालकांना वाहतूक पोलिसांचा दणका; एकूण 159 गुन्हे दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बुरा ना मानो होली है… म्हणत दारू ढोसून तसेच नियम पायदळी तुडवत बेशिस्तपणा करणाऱ्यांना वाहतूक पोलिसांनी वेळीच दणका दिला. पोलिसांनी ठिकठिकाणी कारवाई करत 159 तळीरामांविरोधात गुन्हा दाखल केला, तर नियम मोडणाऱ्यांविरोधात 16 हजार 727 ई-चलानची कारवाई केली. उत्साहाच्या भरात वाहतूक नियम पायदळी तुडवत बेशिस्तपणा करतात. त्यामुळे सह आयुक्त अनिल कुंभारे यांच्या सूचनेनुसार शहरात ठिकठिकाणी विशेष वाहतूक मोहीम राबविण्यात आली होती.