
टी-20 विश्वचषकाच्या रंगमंचावर पुन्हा एकदा जुना नाटय़प्रयोग रंगणार आहे. गतविजेता हिंदुस्थान सलग दुसऱयांदा अंतिम फेरीत झेप घेण्यापासून अवघ्या एका पावलावर उभा आहे. पण त्या वाटेवर पुन्हा एकदा इंग्लंडचा अडथळा उभा ठाकला आहे. आज हिंदुस्थानी संघाने या सामन्यासाठी नेटमध्ये कसून सराव केला. 2022 आणि 2024 नंतर तिसऱयांदा सेमीफायनलमध्ये या दोन संघांची टक्कर होणार आहे. सुपर-8 मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या पराभवाने संघातील काही कमकुवत दुवेही उघड झाले. त्यानंतर मात्र संघाने कमबॅक केले.
























































