
केंद्र सरकारने ओबीसी समाजाची जनगणना केली जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र सध्या सुरू असलेल्या जनगणनेत ओबीसी नोंदणीचा स्वतंत्र रकाना नाही. ही ओबीसी समाजाची फसवणूक असल्याचा आरोप भारत मुक्ती मोर्चा व ओबीसी मोर्चाने केला आहे. आज या संदर्भात निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. जनगणनेत ओबीसी नोंदणीचा रकाना वाढविण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
वर्ष 2011 च्या पूर्वी सेवेत असणाऱ्या शिक्षकांना टिईटी परीक्षेची सक्ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. याबाबत योग्य निर्णय न झाल्यास १३ मार्च रोजी देशभरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदन देताना कुणबी क्रांती संघटनेचे सलील डाफले, तेली समाज संघाचे जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार, त्वष्टा कासार ज्ञाती मंडळ रत्नागिरीचे अध्यक्ष अनिल पोटफोडे, भारत मुक्ती मोर्चाचे संजय कदम, बुध्दिस्ट इटर नॅशनल नेटर्कचे जिल्हाध्यक्ष संजय आयरे, तालुका अध्यक्ष भगवत जाधव, किसान मोर्चाचे विजय कुरतडकर, भिम आर्मीचे प्रदिप पवार, विद्यार्थी मोर्चाचे सौरभ आयरे, प्रोटानचे अध्यक्ष शैलेंद्र औघडे, पावस विभागाचे अध्यक्ष प्रकाश पवार उपस्थित होते.


























































