पीएनबीचा ग्राहकांना झटका, एटीएममधून रोख रक्कम काढण्यावर मर्यादा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी)ने आपल्या ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. बँकेने एटीएममधून दररोज रोख रक्कम काढण्याची मर्यादा अर्धी केली आहे. डेबिट कार्डस्मधून आधी 1 लाखांपर्यंत रोख काढता येते होते. आता केवळ 50 हजार रुपये काढता येतील, तर प्रीमियम कार्डद्वारे केवळ 75 हजार रुपये काढता येतील. आधी दीड लाखांपर्यंत काढता येऊ शकत होते. हा नवीन नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू करणार आहे. रूपे एनसीएमसी प्लॅटिनम, रूपे वुमन पॉवर प्लॅटिनम डेबिट कार्ड, पीएनबी पलाश डेबिट कार्ड, मास्टरकार्ड प्लॅटिनम आणि व्हिसा गोल्ड डेबिट कार्ड, पीएनबी मास्टरकार्ड प्लॅटिनम राईज या कार्डाद्वारे केवळ 50 हजार काढता येतील.