बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर बालाजीच्या चरणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या 29 व्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा आंध्र प्रदेशातील भगवान बालाजीच्या चरणी नतमस्तक झाली. जान्हवी सर्वसामान्य भाविकांप्रमाणे तिरुमाला मंदिरापर्यंत पायी चालली. जान्हवीने तिरुपतीच्या अलिपिरी फुटपाथ मार्गाहून पायी चालत 3,550 पायऱ्या चढून भगवान बालाजीचे दर्शन घेत मनोभावे पूजाअर्चा केली. जान्हवी याआधीही या ठिकाणी दर्शनासाठी आली होती. त्या वेळी तिच्यासोबत शिखर पहाडिया होता. जान्हवी सध्या तेलुगू चित्रपट पेड्डीत दिसणार आहे. या चित्रपटात रामचरण मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 30 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.