
‘धुरंधर’ चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचे मन जिंकणारा अभिनेता अक्षय खन्ना ‘धुरंधर-2’ मध्ये पुन्हा एकदा रहमान डकैतच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘धुरंधर-2’ चित्रपटाच्या ट्रेलरच्या लाँचिंगची माहिती रणवीर सिंहने इन्स्टाग्रामवर शेअर केली असून हा ट्रेलर उद्या 7 मार्च रोजी सकाळी 11 वाजून 1 मिनिटाने दिसणार आहे. ‘धुरंधर ः द रिवेंज’ हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामीळ, कन्नड आणि मल्याळम या भाषांत येत्या 19 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
‘धुरंधर’मधील पहिल्या भागात रहमान डकैतचा मृत्यू झाल्याचे दाखवले आहे. त्यामुळे ‘धुरंधर’च्या दुसऱ्या भागात अक्षय खन्ना दिसणार की नाही? अशी चर्चा सुरू आहे, परंतु चित्रपट निर्माते जेव्हापासून या चित्रपटासंबंधी पोस्ट टाकत आहेत. तेव्हापासून अक्षय खन्नाला टॅग करत आहेत. त्यामुळे ‘धुरंधर-2’मध्ये अक्षय खन्ना दिसेल, अशी शक्यता बळावली आहे. रणवीर सिंहने ‘धुरंधर ः द रिवेंज’च्या ट्रेलरची घोषणा करताना केलेल्या पोस्टमध्ये चित्रपटातील सहा कलाकारांना टॅग केले आहे. यामध्ये रणवीर सिंह, संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि सारा अर्जुनचा समावेश आहे.

























































