बुमरा हिंदुस्थानचा खरा गेम चेंजर, फाफ डू प्लेसिसकडून कौतुकोद्गार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हा साधा गोलंदाज नाही, तर सामना फिरवणारा खरा गेम चेंजरआहे. हिंदुस्थानी संघाला जणू काही हिराच सापडला आहे. बुमराह हा संघासाठी ड्रीम अॅसेटआहे, अशा दमदार शब्दांत दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसने बुमराच्या गोलंदाजीवर काwतुकाचा वर्षाव केला.

वानखेडे स्टेडियमवर हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या उपांत्य सामन्यात बुमराने अक्षरशः सामन्याचा रंग बदलून टाकला. अचूक टप्प्यावर, अचूक वेगात आणि विलक्षण नियंत्रणासह केलेल्या गोलंदाजीने त्याने इंग्लंडचा धावफलक रोखून धरला आणि हिंदुस्थानच्या अंतिम फेरीच्या तिकिटावर शिक्कामोर्तब केले. त्याच्या या दमदार कामगिरीचे क्रिकेटविश्वात सर्वत्र काwतुक होत आहे.

एका क्रिकेट वाहिनीशी बोलताना फाफ डू प्लेसिस म्हणाला की, बुमरा हा अत्यंत वेगळय़ा ढंगाचा आणि धोकादायक गोलंदाज आहे. कठीण परिस्थितीतही सामना आपल्या बाजूने खेचण्याची विलक्षण ताकद त्याच्यात आहे. म्हणूनच तो जगातील सर्वात प्रभावी आणि भीतीदायक गोलंदाजांपैकी एक मानला जातो.

बुमरा म्हणजे संघाचा ‘‘जिन

बुमरा हा संघासाठी जणू काही ‘जिन’च आहे. त्याच्या मनगटातून सुटणाऱ्या चेंडूचा वेग, टप्पा आणि हालचाल इतकी अनपेक्षित असते की फलंदाजांना त्याचा अंदाज लावणे अत्यंत कठीण जाते. म्हणूनच कधीकधी टप्पा चुकला तरी फलंदाज त्याला सहज मोठे फटके मारू शकत नाहीत.

18 वे षटक टार्ंनग पॉइंट

हिंदुस्थानने उभारलेल्या 253 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची गाडी जोरात धावत होती. शेवटच्या तीन षटकांत विजयासाठी त्यांना केवळ 45 धावांची गरज होती आणि सामना इंग्लंडच्या दिशेने झुकत असल्याचे चित्र होते. पण याच वेळी जसप्रीत बुमरा इंग्लंड आणि अंतिम फेरी यांच्यामध्ये भक्कमपणे उभा राहिला. डावातील 18 वे षटक बुमराने इतक्या अचूकतेने टाकले की, तेच सामन्याचे खरे ‘टार्ंनग पॉइंट’ ठरले. प्रचंड दबावाच्या क्षणीही त्याने अप्रतिम नियंत्रण दाखवत त्या षटकात केवळ 6 धावा दिल्या. या षटकाने इंग्लंडच्या धावगतीला ब्रेक लागला आणि सामन्याची दिशा अचानक हिंदुस्थानकडे वळली.