
लहान मुलींपासून तरुणींपर्यंत अनेकांना बार्बी डॉलचे वेड असते. आजच्या युगात महिला प्रत्येक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. त्याच बदलाचे प्रतिबिंब आता बार्बीमध्येही दिसत आहे. म्हणूनच बार्बी फक्त फॅन्सी मॉडेलच्या रूपात नव्हे तर खेळाडू, गायिका, उद्योजिका, अंतराळवीर, रेस कार चालक, गिर्यारोहक अशा विविध रूपांमध्ये दिसणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मॅटेल पंपनीकडून ही संकल्पना राबवण्यात येत आहे. ‘ड्रीम टीम’मध्ये झळकणारी महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाचा समावेश करण्यात आला आहे. बार्बीच्या सोशल मीडिया खात्यावरून या उपक्रमाची माहिती देताना ‘स्वप्न आता खऱया अर्थाने साकार झालंय आणि ते सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे जबरदस्त टीम आहे!’ अशा शब्दांत आनंद व्यक्त करण्यात आला.

























































