
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बोलावलेल्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंद्र सिंग आणि सहसंचालक सतीश पडवळ यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती, पण या दोन्ही अधिकाऱयांनी सभागृहाची दिलगिरी व्यक्त केल्यामुळे दोघांवरील निलंबनाची कारवाई मागे घेण्याचा प्रस्ताव मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात मांडला.




























































