
राष्ट्रीय चर्मकार संघाचा रौप्य महोत्सवी सोहळा येत्या शनिवारी 14 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता धारावीमधील पद्मभूषण मनोहर जोशी महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. राष्ट्रीय चर्मकार संघाचे संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष-माजी आमदार बाबुराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा रौप्य महोत्सवी सोहळा होणार आहे.
या रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त संत शिरोमणी गुरू रविदास महाराज, संत कक्कया महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई आणि माता फातिमा शेख यांचा संयुक्त जयंती महोत्सव यावेळी होणार असल्याचे संघाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष विलास गोरेगावकर, महासचिव गणेश खिलारे यांनी सांगितले. आंबेडकरी विचारांचा अंगार फुलविणारे प्रसिद्ध शाहीर संभाजी भगत यांच्या मनोरंजनाचा बहारदार कार्यक्रम यावेळेस होणार आहे.





























































