Israel Iran War – अमेरिकन तळ आणि बंदरे तत्काळ सोडा; इराणने युएईतील रहिवाशांना इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका, इस्रायल-इराण युद्ध दुसऱ्या आठवड्यातही सुरू आहे. त्यामुळे जगभरात चिंता वाढत आहे. तसेच इंधनाचे भाव गगनाला भिडले आहे. त्यातच आता इराणने यूओईमधील नागरिकांना अमेरिकन तळ आणि बंदरे तत्काळ सोडा, असा इशारा दिल्याने तणाव आणखी वाढला आहे. आखाती देशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या केंद्रीय लष्करी कमांड मुख्यालय, खातम अल-अंबियाने संयुक्त अरब अमिराती (यूएई) मधील रहिवाशांना इशारा जारी केला आहे. मुख्यालयाने रहिवाशांना बंदरे, गोदी क्षेत्रे आणि अमेरिकेशी संलग्न लष्करी तळांभोवतीचे क्षेत्र तत्काळ सोडण्याचा इशारा दिला आहे.

इराणी लष्करी कमांडने म्हटले आहे की संभाव्य हल्ल्याच्या बाबतीत नुकसान टाळण्यासाठी लोकांनी या ठिकाणांपासून दूर राहावे. हा इशारा अशा वेळी देण्यात आला आहे जेव्हा अमेरिका आणि इराणमधील तणाव या प्रदेशात सतत वाढत आहे आणि संभाव्य हल्ल्यांची भीती कायम आहे. इराणने स्पष्ट केले आहे की, जर त्यांच्यावर हल्ले सुरू राहिले तर ते या प्रदेशातील अमेरिकन तळांना लक्ष्य करू शकतात. इराणने अमेरिकेशी वाटाघाटीची शक्यताही फेटाळून लावली आहे आणि म्हटले आहे की आवश्यक असल्यास ते दीर्घकालीन युद्ध लढण्यास तयार आहेत.

अमेरिकेचे लष्करी तळ आणि त्यांच्याशी संबंधित पायाभूत सुविधांना लक्ष्य केले जाऊ शकते. इराणने स्पष्ट केले की, जर त्यांच्याविरुद्ध हल्ले सुरू राहिले तर, ते संपूर्ण प्रदेशातील अमेरिकन लष्करी तळ आणि संबंधित पायाभूत सुविधांना लक्ष्य करू शकतात. त्यामुळे संयुक्त अरब अमिरातीच्या संवेदनशील भागात राहणाऱ्या रहिवाशांना सावधगिरी बाळगण्याचा आणि संभाव्य धोक्याच्या क्षेत्रांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे आखाती प्रदेश अनेक देशांमध्ये सुरक्षा अलर्ट वाढवण्यात आले आहेत आणि नागरिकांना फक्त अधिकृत माहितीवर अवलंबून राहण्याचा सल्ला दिला जात आहे. आखाती देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणने स्पष्ट केले आहे की सध्या अमेरिकेशी कोणत्याही प्रकारच्या चर्चेची शक्यता नाही. सध्याच्या परिस्थितीत इराण वाटाघाटीसाठी तयार नाही आणि गरज पडल्यास दीर्घकाळ युद्धाला तोंड देण्यास सक्षम आहे. इराण कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही आणि गरज पडल्यास दीर्घकाळ संघर्षासाठी तयार आहे. त्यामुळे सध्या युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्हे सध्या दिसत नाही.